37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home शैक्षणिक संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट 2021) शांततेत

संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट 2021) शांततेत

0
41

blank

अमरावती –संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट 2021) दि. 27 नोव्हेंबर, 2021 रोजी 12 परीक्षा केंद्रांवर पहिल्या सत्रात 12.00 ते 1.30 व दुसऱ्या सत्रात 3.00 ते 4.30 या वेळात शांततेत संपन्न झाली.
पहिल्या सत्रात 1806 विद्यार्थ्यांपैकी 1383 विद्यार्थी उपस्थित तर 423 अनुपस्थित होते. दुसऱ्या सत्रात 1759 विद्यार्थ्यांपैकी 1312 विद्यार्थी उपस्थित तर 447 विद्यार्थी अनुपस्थित होते.

आज 57 विषयांमध्ये प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड रिसर्च, बडनेरा, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावती, पी.आर. पोटे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, अमरावती, डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ इन्स्टिट¬ुट अन्ड रिसर्च, अमरावती, सेंटर फॉर इंडक्शन इंटर्नशिप इन्क्युबेशन ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट एच.व्ही.पी.एम., अमरावती, डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन एच.व्ही.पी.एम., अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोला, श्री संत गजानन महाराज महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शेगांव, माऊली गृप ऑफ इन्स्टिट¬ुट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, शेगांव, आबासाहेब पारवेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, पांढरकवडा, जि. यवतमाळ, पंकज लध्दड इन्स्टिट¬ुट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, बुलढाणा या 12 परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली.

परीक्षा केंद्रांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एफ. सी. रघुवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांचे शिवाय व्यवस्थापन परिषद व परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या सदस्यांनी भेट दिली. परीक्षेसाठी विद्यापीठातर्फे ऑब्झर्वर व सुपरवायझर नियुक्त करण्यात आले होते. उद्या दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सदर परीक्षा दोन सत्रात संपन्न होईल.

blank