
गोंदिया,दि.28ः-तालुक्यातील सेजगाव खुर्द यथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील मुला मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व मुले स्वतः शिक्षण आवडीने घ्यावे याकरीता विविध विषयांवर घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले.प्रत्येक वर्गातील स्पर्धेत प्रथम व द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या मुला मुलींना प्रोत्साहनकरीता उपसरपंच प्रमोद पटले यांच्यावतीने स्मृतीचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भरतभाऊ टेकाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भोजलाल बिसेन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पटले, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.गावातील मुले हे गावातील शाळेतच शिकावे व त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण गावातच मिळावे यासाठी अशा स्पर्धा प्रत्येक महिन्याला होणार असल्याचे उपसरंपच पटले यांनी जाहीर केले.





