41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी नयना...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
98

blank

गोंदिया,दि.29 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन निवडणूकीसंदर्भात माहिती दिली, त्यावेळी श्रीमती गुंडे बोलत होत्या. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे पुढे म्हणाल्या, राज्य निवडणूक आयोगाने गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून जिल्ह्यात 26 नोव्हेंबर 2021 पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात रोकड वाहतूक व दारुच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका शांततेच्या वातावरणात व निष्पक्षपणे पार पाडावे. आचारसंहितेत कोणत्याही अधिकाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊ नये, नाहीतर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. निवडणूकीत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करावे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू झालेली असून पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोखपणे बंदोबस्त ठेवावा. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे नविन कामे सुरु करता येणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. आचारसंहिता कालावधीत प्रत्येक विभागाला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही तसेच जाहिराती देता येणार नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

blank