33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मुंडीपार येथील कोवीड लसीकरण कॅम्पला गट विकास अधिकार्यांंची भेट

मुंडीपार येथील कोवीड लसीकरण कॅम्पला गट विकास अधिकार्यांंची भेट

0
59

blank

गोरेगांव,दि.30:-तालुक्यातील मुंडीपार येथील कोरोना विषाणू संसर्ग सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी झेड.टी.टेंभरे यांनी 30 नोव्हेंबरला मुंडीपार येथील ग्राम पंचायत कार्यालयात भेट दिली.ग्रामीण भागात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी सरपंच सुमेंद धमगाये,उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, सचिव अरविंद साखरे,आरोग्य सेवक डॉ. कटरे,आरोग्य सेविका मलघाम मॅडम, आशासेविका,अंगणवाडी सेविका,जि.प.शाळेतील शिक्षकवृंद,ग्रामपंचायत सदस्यगण व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गटविकास अधिकारी म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग गोंदिया जिल्हामध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या काही दिवसात हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तालुक्यात ज्या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत 60 वर्षेवरील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील अतिजोखमीचे आजार असणार्‍या व्यक्तींचे लसीकरण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी गावोगावी जनजागृती करावी, अशा सूचना गटविकास अधिकारी यांनी दिल्या.
आज ग्राम पंचायत कार्यालय मुंडीपार येथे कोव्हसीन लसीचे कैम्प घेण्यात आले.200 डोज लावण्यात आले सदर कम्पला गटविकास अधिकारी यानी भेट देवून तेथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली

blank