
सडक अर्जुनी:–तालुक्यातील कोसमतोंडी येथे १ डिसेंबरला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.अटल अभिनव सहकारी संस्था मुंडीपार (ई) अंतर्गत कोसमतोंडी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.या धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केवळरामजी काशिवार यांचे अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष जितेंद्रकुमार उके(मौर्य)यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी अभिलाषा मॅडम राहांगडाले,अश्विनी काशिवार उपसरपंच, महेंद्र टेंभरे,विलास काशिवार , देवेंद्र कापगते,गोपाळ बावनकर,किसनलाल टेंभरे,केदार गौतम आदि मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. कोसमतोंडी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने कोसमतोंडी व परिसरातील शेतकऱ्यांना धान विक्री साठी सोयीचे झाले आहे





