38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिप, पंस निवडणुकीसाठी 164 नामांकन दाखल

जिप, पंस निवडणुकीसाठी 164 नामांकन दाखल

0
186

blank

गोंदिया,दि.04-जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज 4 डिसेंबर रोजी 148 नामांकन अर्ज दाखल झाले. यात जिप गटासाठी 59 तर पंस गणासाठी 89 नामांकनांचा समावेश आहे.तर आत्तापर्यत जि.प.गटासाठी 66 व पंचायत समिती गणासाठी 98 असे 164 अर्ज सादर प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी व उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांनी दिली आहे.

आज गोंदिया तहसील अंतर्गत जिल्हा परिषदेसाठी 23, सालेकसा 1,गोरेगाव 1, तिरोडा 14,सडक अर्जुनी 13, देवरी 2 आणि अर्जुनी मोरगाव 5 अशा 59 नामांकनाचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी गोंदिया तहसील 50,सालेकसा 3,गोरेगाव 3, तिरोडा 16,सडक अर्जुनी 11, अर्जुनी मोरगाव 6 उमेदवारांनी नामांकन दाखल झाले आहेत.
नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवस शिल्लक आहेत. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना आता सोमवारीच अर्ज भरता येणार आहेत. यामध्ये बहुतांश उमेदवारांकडून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अद्यापपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.मात्र प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळालेल्या जनता की पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे.

blank