41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय काँग्रेसला झटका आशिष नागपूरेंनी घेतली हातात चाबी

काँग्रेसला झटका आशिष नागपूरेंनी घेतली हातात चाबी

0
237

blank

गोंदिया,दि.06ःःगोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी फूलचूर जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार असलेले आशिष गिरिजाशंकरसिंह नागपूरे यांनी अखेर काँग्रेसमधल्या एकाधिकारशाहीला आणि अवमानजनक भूमिकेला कंटाळून पक्षत्याग करीत जनता की पार्टी(चाबी संघटना)मध्ये प्रवेश केला.काँग्रेसी असलेले नागपूरे हे मध्यतंरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.त्यानंतर त्यांनी नाना पटोलेंच्या विचारामुळे काँग्रेसमध्ये परत आले.तेव्हा त्यांना फुलचूर जिल्हा परिषदेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.परंतु यावेळी त्यांना उमेदवारी न देता इतर उमेदवाराला देण्यात आली.त्यामुळे आशिष नागपूरे यांनी काँग्रेस पक्षाला सोडून जनता की पार्टीच्यावतीने फूलचूर जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केला आहे.नागपूरे यांचा पक्षात आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह इतरांनी स्वागत केले.

blank