लाखांदूर-महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर ओबीसींच्या जागा निवडणूक आयोगाने वगळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी बांधवात तिव्र रोष व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा लाखांदूर येथे झालेल्या ओबीसी संघटनेच्या सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला.
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, यासाठी सर्वच स्तरातून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर केल्या. ऐन नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने ओबीसींचे आरक्षण गोठवून ओबीसींवर अन्याय करण्यात आला.
आता ओबीसींची स्वतंत्र्य जनगणना होत नाही, व आरक्षण पूर्वर्वत लागू होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नसून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचा एकमताने निर्णय लाखांदूर येथील ओबीसी बैठकांच्या सभेत घेण्यात आला. याप्रसंगी तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सुरेश लंजे, मोरेश्वर तर्हेकर, अशोक दुपारे, रामचंद्र राऊत, चंद्रप्रकाश क्षेत्रे, वामन वझाडे, गंगाधर ठाकरे, अॅड. मोहन राऊत, देवराम कापगते, टोलीराम बागडे, अरुण डिब्बे, यादव कांवडे, विनायक हाडगे, दामोदर जांभुळकर, गजानन कोटरंगे, प्रमोद प्रधान उपस्थित होते





