32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बिरसी विमानतळासाठी दिल्ली-मुंबई हवाईमार्गाची खा.नेंतेनी केली मागणी

बिरसी विमानतळासाठी दिल्ली-मुंबई हवाईमार्गाची खा.नेंतेनी केली मागणी

0
50

blank

आमगाव,दि.10ः– गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया यांची दिल्ली येथे भेट घेत गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाला दिल्ली-मुंबई हवाई मार्गाशी जोडण्याची मागणी करीत निवेदन दिले.बिरसी विमानतळाला आधीच इंदोर गोंदिया हैद्राबाद मार्ग मंजूर झालेले आहे.बिरसी विमानतळ हे कान्हा केसरी व्याघ्रप्रकल्पाजवळ असल्याने देशविदेशी पर्यटकासांठी हे विमानतळ अत्यंत महत्वाचे असल्याने या बिरसी विमानतळावा दिल्ली व मुंबई हवाई मार्गाशी जोडण्याची मागणी खा.नेते यांनी केली आहे.त्यावर विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांनी लवकरच या मार्गाला मंजूरी देत विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.

blank