35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून विनय मून यांची नियुक्ती

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून विनय मून यांची नियुक्ती

0
104

blank

हरकती तक्रारीसाठी संपर्क साधावा
गोंदिया- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सोबत दोन निवडणूक निरीक्षक सुद्धा नेमण्यात आले आहेत. निवडणुकी संदर्भात काही हरकती, तक्रारी किंवा प्रश्न असल्यास सोबत दिलेल्या भ्रमणध्वनीवर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक निरीक्षक विनय मून 7721078855, गोंदिया, आमगाव, सालेकसा, तिरोडा तालुक्याचे निवडणूक निरीक्षक जिल्हा उप निबंधक भंडारा मनोज देशकर 9422111868, सडक अर्जुनी, देवरी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्याचे निवडणूक निरीक्षक उपवनसंरक्षक भंडारा एस.बी.भलावी 9422830750 असे भ्रमणध्वनी आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूका संबधी मतदाराच्या काही हरकती, तक्रार असल्यास त्याबाबतची नोंद या निवडणूकांसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक व मुख्य
निवडणूक निरीक्षक यांच्या भम्रण क्रमांकावर करण्यात यावी, उपरोक्त क्रमांकावर प्राप्त झालेल्या सर्व हरकती, तक्रारींची
दखल घेण्यात येईल. कृपया याची सर्व संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सामान्य स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे.

blank