
आमगाव--पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या येथील चंपाषसठी जत्रेचे आयोजन दहा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या जत्रेचे उदघाटन बाजार समिती चे सभापती केशवराव मानकर यांचे नातु अनंत हरिहर मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाला समितीचे संचालक गोकुल फाफट, टिकारामभाऊ मेंढे, विकास महारवाडे, भाजपा महामंत्री राजु पटले, सचिव सुभाष चौहान, गजेंद्र चुटे, लक्ष्मण चुटे, बी बी, बिसेन, जत्रा समिती चे अशरफ भाटी, कांतेय ऊके सुनिल पडोळे उपस्थित होते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जत्रेचे आयोजन करण्यात येते परंतु यंदा जत्रा डिसेंबर महिन्यात पुढे ढकलण्यात आली. यावर्षी टाळेबंदी नसली तरी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे बाजार समितीचे सभापती माजी आमदार केशवराव मानकर यांनी जत्रेचे संयोजक यांना सांगितले, नागपूर येथील भाटी अमयूजमेंट कंपनीचे भाटी यांनी बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने जत्रेची परंपरा खंडीत होवू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेवुन जत्रेचा आयोजनाला परवानगी दिली, यावेळी भाटी यांनी सर्वांचे आभार मानले.





