37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ प्रचारतोफा थंडावल्या;पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांचा निवडणूकीत सहभाग

प्रचारतोफा थंडावल्या;पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांचा निवडणूकीत सहभाग

0
122

blank

गोंदिया- जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी होणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी व तिरोडा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत येणारे अंगणवाडी सेविकांना निवडणूक कार्यात सहभागी करुन घेण्यात आले आहे. दरवेळी या कामात शासकीय कर्मचारी, शिक्षक, निमशासकीय विभागाचे कर्मचाऱ्यांचा समावेश असयाचा.मात्र यावेळी जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांची संख्या अधिक असल्याने अंगणवाडी सेविकांना पहिल्यादांच निवडणुकीच्या कामात सहभागी करुन घेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील 1375 मतदान केंद्रावर ही निवडणुक होणार असून यासाठीचा प्रचार आज थंडावला आहे.जिल्हा  परिषदेच्या ४३ तर, आठ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी एकूण ६३१ उमेदवार रिंगणात असून आज सायकांळी प्रचारतोफा थंडावल्या आहेत.

पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांचा निवडणूक कार्यक्रमात सहभाग
देवरी प्रकल्पातील 50 अंगणवाडी सेविका, सडक अर्जुनी तालुक्यातील 60 सेविका, अर्जुनी-मोर तालुक्यातील 50 अंगणवाडी सेविका व तिरोडा तालुक्यातील 81 अंगणवाडी सेविकांना निवडणूक कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ८ लाख ३८ हजार ९७७ मतदार करणार आहेत. गोंदिया तालुका एकूण मतदान संख्या २ लाख ३१ हजार ४७८ आहे. पैकी पुरुष मतदान संख्या १ लाख १४ हजार ८९० तर महिला मतदार संख्या १ लाख १६ हजार ५८७ आहे. तिरोडा तालुका एकूण मतदार संख्या १ लाख १९ हजार २४ पुरुष मतदार संख्या ५९ हजार ५६९ तर महिला मतदार संख्या ५९ हजार ४५५ आहे. आमगाव तालुका एकूण मतदार संख्या ७१ हजार १४५ असून पुरुष मतदार संख्या ३५ हजार ४३० तर महिला मतदार ३५ हजार ७१५ आहे. सालेकसा तालुका एकूण मतदार संख्या ६४ हजार ८९० असून पुरुष मतदार संख्या ३२ हजार ५३३ तर महिला मतदार संख्या ३२ हजार ३५७ आहे. देवरी तालुका एकूण मतदार संख्या ७५ जाहीर ३५५ असून पुरुष मतदार संख्या ३८ हजार ३५९ तर महिला मतदार संख्या ३६ हजार ९९६ आहे. सडक-अर्जुनी तालुका एकूण मतदार संख्या ७९ हजार ६४१ पुरुष मतदार संख्या ४० हजार ८६ तर महिला मतदार संख्या ३९ हजार ५७३ आहे. अर्जुनी-मोरगाव तालुका एकूण मतदार संख्या ९९ हजार ३३५ पुरुष मतदार संख्या ५० हजार ३६० तर महिला मतदार संख्या ४८ हजार ९७५ आहे. गोरेगाव तालुका एकूण मतदार संख्या ९८ हजार १०९ पुरुष मतदार संख्या ४८ हजार ५७६ तर महिला मतदार संख्या ४९ हजार ५३२ आहे.

blank