
गोंदिया,दि.23 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन
समिती सभागृहात 23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील
आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहिर करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी
(सामान्य) स्मिता बेलपत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण न्यायालयाने स्थगित
केल्यामुळे या जागा अनारक्षित करुन सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या
करण्यात आल्या आहे. या जागांमधून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत आज
काढण्यात आली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 10 विभाग राखीव होते, ते
आता सर्वसाधारण करण्यात आले व त्यातील 5 जागा सर्वसाधारण महिलांसाठी
आरक्षित करण्यात आल्या. यात 50 टक्के म्हणजे 5 जागा महिलांसाठी आरक्षीत
करण्यात आल्या असून सर्वसाधारण प्रवर्गामध्ये विभाग क्रमांक 15-घाटटेमनी,
16-किकरीपार, 29-निंबा, 33-ठाणेगाव(महिला), 37-पांढरी(महिला),
49-बोंडगावदेवी, 50-माहूरकुडा(महिला), 51-ईटखेडा(महिला),
52-महागाव(महिला), 53-केशोरी या विभागाचा समावेश आहे. आरक्षण सोडत
प्रियांशी रहांगडाले या चिमुकल्या मुलीच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने
सर्वांसमक्ष काढण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,
पत्रकार व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.





