
*गोंदिया* :- संवैधानिक एकता, शांतता, बंधुता आणि निरोगी भारत, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी गोंदिया डेली सायकलिंग ग्रुपचे सायकलपटू व संविधान मैत्री संघाचे संरक्षक अशोक मेश्राम यांनी गोंदिया ते नागपूर (दीक्षाभूमी), पुणे (भीमा कोरेगाव), मुंबई (चैत्यभूमी) पर्यन्त परतीचा 2500 किमी इतका सायकल प्रवास शनिवार, दि. 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7:00 वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौक, प्रशासकीय इमारत, गोंदिया येथून प्रारंभ केला आहे.
सायकलपटू अशोक मेश्राम हे गोंदिया डेली सायकलिंग ग्रुप आणि संविधान मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथून नागपुर-यवतमाळ-पुणे-मुंबई सायकलिंग प्रवासावर रवाना झालेले आहेत. तर परतीला मुंबई ते नाशिक अमरावती, नागपुर गोंदिया या मार्गाने 2500 किलोमीटर प्रवास करणार आहेत. या प्रवासाला त्याना जवळपास 20 दिवस लागणार आहेत. संविधान मैत्री संघ आणि गोंदिया डेली सायकलिंग ग्रुपच्या वतीने त्याना गंतव्यासाठी रवाना करण्यात आले. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व महिलाशक्ति- विद्यार्थ्यानी हिरवी झेंडी दाखवून त्यांची रवानगी केली। या प्रसंगी अशोक मेश्राम ज्याना प्रोत्साहन देण्यासाठी सायकलिस्ट यांची पत्नी लक्ष्मी मेश्राम, मुलगा संघर्ष मेश्राम, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, समता सैनिक दलाच्या किरण वासनिक, आम्ही सिद्ध लेखिका च्या प्रा.डॉ.दिशा गेडाम, बिरसा क्रांति दलाच्या मालती किन्नाके, राणी दुर्गावती महिला मंडळच्या हेमलता आहाके, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, रवि भांडारकर, सुनील भोंगाड़े, परेश दुरुगवार, कलाकार संघटनेचे दिलीप कोसरे, दिनेश फरकुंडे, चेतानंद लांजेवार, गुड्डू चांदवानी, दीपक घरडे, दिनेश ऊके, पृथ्वी मेश्राम, दीपक वाहने, विशाल रंगारी, बसंत गणवीर, राजू राहुलकर आदि 2500 किलोमीटरच्या सायकल प्रवासाकरीता निघालेल्या अशोक मेश्राम यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते.





