38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाच्या कार्यकारिणीचे गठण

आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाच्या कार्यकारिणीचे गठण

0
107

blank

गोंदिया,दि.27ः- संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या सत्य- परिश्रम- एकनिष्ठ या आदर्श विचारांचा ठेवा समाजापर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोचविण्यासाठी आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाच्या कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.यात अध्यक्षपदावर वासुदेव आत्माराम वंजारी यांची निवड करण्यात आली.तर उर्वरित कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष लोकचंद डोनेकर, कार्याध्यक्ष कृष्णा कापसे, सचिव शेषराज आकरे, कोषाध्यक्ष सतीश वंजारी, महिला प्रमुख माधुरीताई नासरे, युवा प्रमुख हरिश तुळसकर, प्रसिद्धी प्रमुख कमल हटवार, संघटक प्रमुख माधव भेलावे, संपर्क प्रमुख मिलिंद समरित व कार्यालयीन चिटणीसपदी दिनेश गायधने यांची निवड करण्यात आली.

ही सभा अध्यक्ष भारत पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली एल.एफ.गिऱ्हेपुंजे,मनोहर कापसे,भक्तराज भेलावे,एस.यु.वंजारी,किष्णा कापसे, मिलिंद समरित,दिलीप पाटिल,माधुरीताई नासरे, मुकुंद धुर्वे, लोकचंद डोनेकर, वासुदेव वंजारी, उमेंद्र भेलावे, दिनेश गायधने, वसंत निखाडे,बाळकृष्ण पालपांडे, माधव भेलावे, सतिश वंजारी, कमल भोंगाडे, सचिन पाटिल, हरिश तुळसकर, मुकेश पाटिल, कुणाल वंजारी, शशिकांत बावणकर, एस पी कुंभलकर, कमल हटवार,टि.के.बावनकर,महेंद्र मोटघरे,प्रमोद बडवाईक,शेषराज आकरे, माधुरी भेलावे,मालती कापसे,यशोदा बिसेन, सिंधू मोटघरे, यामिनी धुर्वे, धनेश्वरी कुंभलकर वर्षा खोब्रागडे, सुनिता वैद्य, सुरेखा गायधने,स्वाती शाव,माधुरीताई निखाडे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाची २०२२ करीता वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वार्षिक कार्यकारिणीचे गठण करण्यात आले.सभेचे सुत्रसंचलन एस यु वंजारी यांनी केले,व मागील जयंती कार्यक्रमाचा जमा खर्च सचिव एस.पी.कुंभलकर यांनी ठेवले.तर आभार शेषराव आकरे यांनी मानले.

blank