43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ विदर्भातील नगरपालिकांवर प्रशासक,भंडारा-गोंदियातील 6 नगरपरिषदांचा समावेश

विदर्भातील नगरपालिकांवर प्रशासक,भंडारा-गोंदियातील 6 नगरपरिषदांचा समावेश

0
110
OLYMPUS DIGITAL CAMERA

blank

भंडारा,गोंदियासह विदर्भातील नगरपालिकांवर प्रशासक
– कार्यकाळ संपला, निवडणुका नाही

गोंदिया,दि.29ः,राज्यसरकारने महाराष्ट्रातील नगरपालिकांचा कार्यकाळ संपत असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूका घेण्यास अडचण येत असल्याने प्रशासकांची नियुक्ती केली आहे.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषदेचा कार्यकाळ 9 फेबुवारीला तर भंडारा जिल्ह्यातील भंडारा व तुमसर नगरपरिषदेचा कार्यकाळ 6 व 7 फेबुवारीला तर पवनी व साकोली नगरपरिषदेचा कार्यकाळ 15 जानेवारीला संपत असल्याने याठिकाणी प्रशासक म्हणून संबधित उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.गडचिरोली,देसाईगंज,मुल,राजुरा,वरोरा ,बल्लारपूर,सिंदेवाही-लोणवाही या नगरपरिषदावरही प्रशासक नेमण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील 10 पैकी 9 नगरपालिकांवार प्रशासक Administrator नियुक्त करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या 9 ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे येथे राज्य शासनाने प्रशासक नेमण्याचा आदेश काढला.अचलपूर,अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,चांदूरबाजार,मोर्शी, वरुड, शेंदुरजनाघाट, चांदूर रेल्वे या आठ नगरपालिकांचा कार्यकाळ 28 डिसेंबरला तर धामणगाव रेल्वे नगरपालिकेचा कार्यकाळ 29 डिसेंबरला संपुष्टात आला. चिखलदरा नगरपालिकेचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही. ज्या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्युत करण्यात आले आहे, त्यांचा कार्यकाळ पहिल्या सभेपासूनसू गृहीत धरण्यात आला आहे. येथील निवडणुका इतक्यात होण्याची शक्यता नसली तरी प्रभाग संरचनेची प्रक्रिया मात्र पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.

blank