34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील 68 हजार 321 मुलांना मिळणार कोव्हॅक्सीन लस

जिल्ह्यातील 68 हजार 321 मुलांना मिळणार कोव्हॅक्सीन लस

0
45

blank

गोंदिया,दि.30 : देशात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत
असलेल्या ओमायक्रॉन व्हेरीयंटमुळे कोविड-19 वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल
टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑफ ईम्युनायजेशन (NTAGI) तसेच स्टॅंडिंग
टेक्निकल सायंटिफिक कमिटी (STSC) यांनी कोविड-19  लसीकरण वाढविण्यासाठी
केंद्राला राज्यांमध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलींना कोविड
लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने
राज्यात 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलींना
कोविड-19 लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र व राज्य
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्यात 68 हजार 321 मुले व
मुलींना कोव्हॅक्सीन लस मिळणार आहे.

सदर 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीकरणासाठी खालील निकष ठरविण्यात
आलेले आहे.
• सदर लसीकरणासाठी 2007 किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील.
• सदर लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सीन लसीचाच वापर करण्यात येईल.
• लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे
लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा 1 जानेवारी 2022 पासून
सुरू होईल.
• लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (onsite) जाऊन नोंदणी करण्याची सुविधा
सुद्धा उपलब्ध आहे.
• 15 ते 18  वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण
केंद्र निश्चित करावे लागेल. ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य
नसेल अशा ठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.
कोविड लसीकरणासाठी तालुका निहाय लाभार्थी पुढीलप्रमाणे. गोंदिया
ग्रामीण-14926  व गोंदिया शहरी-6656, आमगाव-6961, तिरोडा-8934,
गोरेगाव-6351, सालेकसा-4788, देवरी-6085, सडक अर्जुनी-5996, अर्जुनी
मोरगाव-7626.

blank