
चंद्रपूर,-एका युवकावर वाघाने tiger हल्ला करून ठार केले. ही घटना गुरूवारी सायंकाळच्या
सुमारास मूल तालुक्यातील तथा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक 351
मध्ये घडली. भारत कोवे असे मृतकाचे नाव आहे.मूल तालुक्यातील डोणी येथील रहिवासी मृतक
भारत हा कामानिमित्त फुलझरी येथे गेले होता. काम आटोपूनपू डोणी गावाकडे परत जात असताना वाघाने त्याच्यावर झडप घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनाधिकार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत देह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. घटना स्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर,जानाळ्याचे क्षेत्र सहाय्यक विनोद धुर्वे, मूलचे पोलिस निरिक्षक सतिषसिंह राजपूत यांनी भेट दिली.





