34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ वेतनासाठी चक्क 11 कर्मचाऱ्यानी जो़डले बोगस लसीकरणाचे प्रमाणपत्र

वेतनासाठी चक्क 11 कर्मचाऱ्यानी जो़डले बोगस लसीकरणाचे प्रमाणपत्र

0
96

blank

गोंदिया,दि.03 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती.त्याअनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनानेही आपल्या अधिनस्थ सर्व आस्थापनांना त्यासंबधीचे निर्देश दिले होते.त्या निर्देशामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या काही शिक्षकांनी आपले वेतन थांबू नये यासाठी घेतल्यामुळे लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र 11 शिक्षकांनी दिल्याचे उघडकीस आले आहे.विशेष म्हणजे हा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असल्याचेही समोर आले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथून लस दिल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे,त्यात एकाच आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे वेतन पथक कार्यालयात सदर वेतनाचे बिल गेल्यानंतर पडताळणीच्या वेळी समोर आले आहे.त्या सर्वांचे नाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविण्यात आले असून जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

blank