38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जगत महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जगत महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
35

blank

गोरेगाव:- स्थानिक जगत कला वाणिज्य व इंदिराबेन हरीहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे होते तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. एस. एच. भैरम, सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी डॉ. एस.टी. नंदेश्वर, डॉ. जे. बी. बघेले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे यांनी आपल्या मार्गदर्शनातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने महिलांच्या उद्धारकर्ते आहेत अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले .

blank