35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोंदियाच्या सहविचार सभेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती...

पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोंदियाच्या सहविचार सभेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
34

blank

गोंदिया,दि.५.  जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्रातील लेकीचा अभियानात दिनांक ३ ते १२ जानेवारी २०२२ सक्रिय सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती व महिला मंच गोंदियाच्या माध्यमातून 3 जानेवारी रोजी सहविचार सभा बोलावून सावित्रीबाई फुले जयंती बालीका दिवस म्हणून साजरा करण्यात आला.अभियानाची सुरूवात जिल्हा परिषद गोंदियाच्या मध्यवर्ती कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात करण्यात आली. जिल्ह्यात संघटनेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष राजानंद वैद्य  यांनी सांगितले.कार्यक्रमाची सांगता गोरेगाव तालुक्यांत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी महिला अध्यक्ष प्राजक्ता रणदिवे यांनी केले.सावित्रीबाईंच्या जिवन चरित्र प्रमुख उपस्थितीत असलेले जिल्हा नेते नेतराम बिजेवार यांनी विषद केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे यांनी सुत्रसंचलन करीत संपुर्ण कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सिध्दार्थ मेश्राम, मुख्याध्यापक शरद उपलपवार, प्रसिध्दी प्रमुख प्रमोद बघेले, जिल्हा सरचिटणीस जयश्री सिरसाटे,अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गणवीर मंचावर उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांचे हस्ते पुजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.राज्य आदर्श शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झालेल्या नेते नेतराम बिजेवार व जिल्हा अध्यक्ष प्राजक्ता रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षांचे अनुमतीने सभेतील सर्व विषयांवर चर्चा करून शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम यांची भेट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.तद्नंतर शिष्टमंडळ सभेला सुरूवात करण्यात आली. खालील विषयांवर सविस्तर चर्चा केली असता संघटनेला प्रशासनाच्यावतीने दिलेली माहीती अशी आहे.
यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी डोंगरे यांचेसह प्रमुख संघटक उत्तम टेंभरे, गोंदिया तालुका अध्यक्ष एस.एम.बिसेन,कु.सरिता वराडे,सौ.प्रेमलता टेंभरे, सुनील निनावे ,बेनेश्वर कटरे ,शंकर ठाकरे, मधुकर पारधी व
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोंदिया व महिला मंच गोंदियाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

blank