
गोंदिया- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार १ जानेवारी २0२१ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार १८,७४३ मतदार १८,७४३ वाढले असून ४,७५८ मतदारांना वगळण्यात आले. जिल्ह्यात १0,९३,१00 मतदारांची नोंदणी झाली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात एकूण पुरूष मतदार संख्या ५ लाख ४४ हजार २४३ असून महिला मतदारांची संख्या ५ लाख ४८ हजार ८५२ आहे. यामुळे महिला मतदार या ४ हजार सहाशे नऊने अधिक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यातंर्गत जिल्हा निवडणूक आयोगातर्फे पुनरिक्षण कार्यक्रम राबवून ५ जानेवारी रोजी विधानसभा निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, आठही तहसील कार्यालय व जिल्ह्यातील १२८२ केंद्रावर लावण्यात आल्या आहेत.
गोंदिया विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदारांची संख्या असून १,५२,४२६ पुरुष, १,५५,९७३ महिला व १ तृतीयपंथी असे एकूण ३,0८,४0२ मतदार आहेत. आमगाव विधानसभा क्षेत्रात १,३४,३४१ पुरुष, १,३४,७१५ महिला असे २,६९,0५६ मतदार. तिरोडा विधानसभा क्षेत्रात १,३0,२६२ पुरुष, १,३२,७२८ महिला व ३ तृतीयपंथी असे २,६२,९९३ मतदार आणि अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात १,२७,२१७ पुरुष, १,२५,४३४ महिला व १ तृतीयपंथी असे २,५२,६४९ मतदार आहेत. विशेष म्हणजे अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र वगळता इतर तीन विधानसभा क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. या कार्यक्रमातंर्गत ४,७५८ मतदारांना वगळण्यात आले असून १८,७४३ नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे.
जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण करणार्या व्यक्तींनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्याकरिता आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकार्याकडे नमुना ६ चा अर्ज सादर करावा किंवा ‘एनव्हीएसपी’ या पोर्टलवर लॉगीन करुन ऑनलाईन पद्धतीने नमुना ६ अर्ज सादर करुन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण करणार्या व्यक्तींनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्याकरिता आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकार्याकडे नमुना ६ चा अर्ज सादर करावा किंवा ‘एनव्हीएसपी’ या पोर्टलवर लॉगीन करुन ऑनलाईन पद्धतीने नमुना ६ अर्ज सादर करुन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.





