34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी व सीईओंची शालेय लसीकरण केंद्राला भेट,विद्यार्थ्यांचे 54 टक्के लसीकरण पुर्ण

जिल्हाधिकारी व सीईओंची शालेय लसीकरण केंद्राला भेट,विद्यार्थ्यांचे 54 टक्के लसीकरण पुर्ण

0
112

blank

गोंदिया,दि.09ः- जिल्ह्यात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.सुरुवातीला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र,केटीएस रुग्णालय,6 ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, नागरी आरोग्य केंद्र कुंभारे नगर एकूण 49 लसीकरण केंद्रातून सुरुवात झाली.नंतरच्या काळात विद्यार्थ्यांची लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उत्कृष्ट नियोजन नुसार शाळेतच लसीकरण करण्यास सुरवात झाली.blank
या शालेय लसीकरण केंद्रावर जाऊन जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी सवांद साधला सोबतच शाळेच्या शिक्षकांसोबत चर्चा करीत लसीकरणासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावागात जनजागृती करण्याचा सुचना दिल्या. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या हायस्कूल येथे तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथील लसीकरण केंद्राला भेट देत पाहणी केली.यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार,गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी गोरेगाव तालुक्यातील शहिद जाम्या तिम्या हायस्कूल व गोंदियातील सिंधी हायस्कूलला भेट दिली.शाळेतील हजेरीपटानुसार 100% बालकांचे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 68 हजार 321 उद्दिष्टंापैकी आत्तापर्यंत 37 हजार 563 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन लसीचे पहिला डोस देण्यात आलेला आहे.

blank