40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home शैक्षणिक गोरेगावची स्नेहल बोपचे आकाशवाणीवर

गोरेगावची स्नेहल बोपचे आकाशवाणीवर

0
100

गोरेगाव : स्थानिक शहीद जाम्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी स्नेहल लेखेद्रकुमार बोपचे हिची नागपूर आकाशवाणी केंद्रावर ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमांतर्गत मुलाखतीसाठी निवड झाली. नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून भाज्य, भाजक व विभाजक या विषयावर तिची मुलाखत घेण्यात आली. विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या प्रेरणेने व विद्या प्राधिकरण, नागपूर आणि प्रथम फाउंडेशनतर्फे लॉकडाऊन काळात राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात खंड पडू नये व त्यांचे स्वयंअध्ययन व्हावे, या उद्देशाने शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, कृतीयुक्त व आपल्या परिसरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थी यांनी आपला शैक्षणिक विकास कसा साधावा? या दृष्टीने राज्यभर हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दर आठवड्याला वर्गनिहाय एका शाळेतील एका वगार्ची निवड करून एका विद्याथ्यार्ला आकाशवाणी नागपूर येथे बोलण्याची संधी देण्यात येते. दर आठवड्याला विद्यार्थ्यांना कार्य देण्यात येते. त्यानुसार केलेल्या अध्ययन कृतींची माहिती सर्वांना व्हावी म्हणून आकाशवाणीवर बोलण्याची संधी मिळते.
स्नेहलने विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने व सविस्तर उत्तरे दिली. शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम मोबाइलद्वारे व प्रत्यक्ष भेटीतून राबविला जातो. आकाशवाणीवर प्रसारित होणार्‍या ‘शाळेबाहेची शाळा’ या उपक्रमाचे सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत करून अवश्य ऐकावे, असे प्राचार्य डॉक्टर पी.आर. लोंढे यांनी कळविले आहे.