
*भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा
सडक अर्जुनी:-(महेंद्र टेंभरे):--जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२अनुषंगाने पांढरी जिल्हा परिषद क्षेत्राचे उमेदवार छायाताई चौव्हाण, कोसमतोंडी पंचायत समिती क्षेत्राचे उमेदवार निशाताई काशिवार, कोकणा पंचायत समिती क्षेत्राचे उमेदवार खेमराज भेंडारकर यांचे निवडणूक प्रचारार्थ माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे उपस्थित कोसमतोंडी , पांढरी, कोकणा येथे कार्यकर्ता मेळावा ९ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भाजपा नेहमी जनकल्याणाचे कार्य करण्यासाठी तत्पर असते. केंद्रीय सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य करण्यात आले आहेत.आणि पूढे सुद्धा सुरूच राहील.भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आशिर्वाद द्यावा.तसेच सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तनमनधनाने कार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यकर्ता मेळाव्याला माजी आमदार खोमेश राहांगडाले, तालुकाध्यक्ष अशोक लंजे, लक्ष्मीकांत धनगाये, जिवन लंजे, शेषराव गि-हेपुंजे, डॉ.भुमेश्वर पटले,विश्वनाथभाऊ राहांगडाले,राजेश कठाणे, माजी जि.प.सदस्य मिलन राऊत,गिरीधारी हत्तीमारे,शिशीर येळे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,पद्माताई परतेकी, कविताताई रंगारी,शिलाताई चव्हाण,शिलाताई भेंडारकर, पांढरी जि. प.च्या उमेदवार छायाताई चौव्हाण,पं.स.च्या उमेदवार निशाताई काशिवार,गौरेश बावनकर,मनोहर काशिवार,शालिंदर कापगते, गुड्डू डोंगरवार,प्रल्हाद वरठे, विलास चौव्हाण,मयुर रामटेके,डिलेश सोनटक्के,व्यंकट चौधरी,विनोद काशिवार यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख स्थानिक कार्यकर्ता नागरिक उपस्थित होते.





