38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ युवकांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी नयना गुंडे

युवकांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
50

blank

गोंदिया,दि.15ः- रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे,त्यामुळे युवकांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा असे आवाहन गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा नयना गुंडे यांनी केले.
आज बाई गंगाबाई महिला रुग्णालयात शासकीय मेडिकल कॉलेजच्या रक्तपेढीत स्वयंप्रेरणेने येऊन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी स्वेच्छा रक्तदान केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे,रक्तपेढी अधिकारी डॉ पल्लवी गेडाम, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर, नर्सिंग स्टाफ रिटा शिंदे,पीआरओ अनिल गोंडाने आणि रक्तपेढी पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित होते.स्वेच्छा रक्तदानाबद्दल रक्तपेढीतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांचे हस्ते जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा राज्य रक्त संक्रमण परिषदचे सन्मान पत्र व डोनर कार्ड देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. कॉरोना पांडेमिकच्या काळात रक्ताची मागणी वाढलेली आहे.पण रक्तदान शिबिरांची संख्या कमी आहे,त्यातच शाळा कॉलेज बंद असल्याने नियमित शिबीर बंद आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील युवा शक्तीने पाच पाचच्या ग्रुपने रक्त पेढीत येऊन रक्तदान करून जीवनदान दयावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी यावेळी केले.

blank