33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ येरंडी गावात दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित

येरंडी गावात दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित

0
31

अर्जूनी/मोर–अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी गावात विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा नागरिकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून गावात विज नाही. यामुळे नागरिक अंधारात राहत आहे. शिवाय याची माहिती लाइनमनला देण्यात आली. परंतु, विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणतर्पेष्ठ पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश असून दुरूस्तीची मागणी केली जात आहे.
तालुक्यातील येरंडी गावात विजेची समस्या गंभीर झाली आहे. वारंवार विज जाण्याचा प्रकारामुळे येरंडी गावातील नागरिक वैतागून गेले आहेत. नाहक विद्युत बंद करणे हा विज कर्मचा-यांचा धंदा बनला आहे. काम असो किंवा नसो विज बंद करायचीच. अशाप्रकारे नागरिकांना नाहक त्रास देणे सुरू आहे. एखाद्या नागरिकांनी विज बिल न भरला तर कोणत्याही सुचना न देता सरळ विज कापली जाते. असाही प्रकार सुरू आहे. महावितरण कर्मचारी विज जोडणी खंडीत करण्यासाठी बरोबर येतात. परंतु, विज पुरवठा खंडीत झाला तर त्याला दुरूस्त करण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. १४ व १५ जानेवारी दोन दिवसापासून परिसरातील विज पुरवठा खंडीत आहे. असे असूनही महावितरणचे याकडे लक्ष नाही. नागरिकांची याची माहिती लाईनमन ला दिली. परंतु, लाइनमनकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय साधा फोन उचलण्याचे औदार्य लाइनमनने दाखविले नाही. यामुळे मागील दोन दिवसांपासून येरंडी गावातील नागरिक अंधारात राहत आहेत. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देवून विजेची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे.