
भंडारा,दि.16ः-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी आपल तिकीट कापून पक्षाने नाना पटोले यांना उमेदवारी दिल्याने व्यथित झालेल्या
माजी आमदार सेवक वाघाये यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढविणाली होती.आत्ता जिल्हा परिषद निवडणुकीच्या दुसर्या टप्यातील मतदानाच्या दोन दिवसाआधी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतले असून पटोलेंच्या उमेदवारी मुळेच काँग्रेस सोडण्याची वेळ आपल्यावर आली होती, याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा त्यांनी केला. साकोली विधानसभा मतदारसंघाचे दोनदा नेतृत्तृव करणारे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांचे या भागात चांगले प्रस्थ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले काँग्रेसमध्ये आल्याने यांच्या उमेदवारीवर गदा आली. काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून वाघाये यांनी पुरेपुर प्रयत्न केले.उमेदवारी निश्चित झाल्याचे ते सांगतही होते मात्र आपली उमेदवारी कापून नाना पटोले यांना उमेदवारी दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या सेवक वाघाये यांनी काँग्रेसला रामराम करीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी स्वीकारली. निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीमुळे चांगली चुरस निर्माण झाली होती. अवघ्या पाच हजार मतांनी नाना पटोले यांचा विजय झाला होता. तेव्हापासून जवळपास दोन वर्ष माजी आमदार सेवक वाघाये कुठल्याही राजकीय व्यासपीठावर दिसले नाही. काँग्रेसमधून बाहेर पडलेले वाघाये शनिवारला अचानक स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूर्श्वमीवर काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या
प्रचारसभेत व्यासपीठावर असलेल्या आमदार वाघाये यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली हे स्पष्ट झाले. काँग्रेसची जिल्ह्यातील डामाडोल परिस्थिती पाहून वाघाये यांना पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या पटोले यांच्यावर वैतागून त्यांनी काँग्रेस सोडली होती, त्याच पटोलेंनी वाघाये यांना आणण्यासाठी पालकमंत्र्यांवर जबाबदारी सोपविली होती, अशी चर्चा आहे. आता तरी वाघाये यांना पक्षात किती मान सन्मान दिला जातो हे येणारा काळच सांगेल.





