29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News नाना पटोलेंचे मोदींबद्दल आक्षेपार्ह उद्गार !

नाना पटोलेंचे मोदींबद्दल आक्षेपार्ह उद्गार !

0
396

blank

– व्हायरल व्हिडिओवर संताप, खा. मेंढेसह भाजपच्यावतीने पोलिस ठाण्यात दाखल
गोंदिया/लाखनी,दि.17 : काँग्रेसचे प्रदेध्याध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित रुपाने अनुदगार व आक्षेपार्ह उद्गार काढत असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मात्र, आमचे प्रदेशाध्यक्ष पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नव्हे तर एका स्थानिकाबद्दल बोलत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी श्री. पटोले Patole यांची पाठराखण केली आहे.
संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभे दरम्यान नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्तत्र सोडले. ‘मी का भांडतोय, गेल्या ३० वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. लोक ५ वर्षांमध्ये पिढीचा उद्धार करून घेतात, एवढ्या शाळा, कॉलेज उभारत असतात आणि आपल्या पुढच्या पिढीचा उद्धार करून टाकतात. मी एवढ्या राजकारणात एक शाळा सुद्धा घेतली नाही, त्यामुळे मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रामाणिक नेतृत्व इथं आहे. त्याला हे लोक चक्रव्युहात फफसवतात, असं विधान नाना पटोले यांनी लोकांशी बोलतांना केलं. नानाच्या वक्तव्यावर आता राज्यभरातून वेगळा प्रतिक्रिया उमटत आहेत.
भंडाऱयाचे खासदार सुनील मेंढे याविषयावर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले.तिरोडा येथेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ पुरेसा स्पष्ट नाही. श्री. पटोले यांच्यासारखी व्यक्ती लोकांशी बोलताना श्री. मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढताना या व्हिडिओत ऐकू येते.ते हातवारेही दिसतात. मात्र, काँग्रेसची ही संस्कृती नाही, असे सांगत श्री. लोंढे यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.माहितीनुसार, पंजाबातील PM Modi पंतप्रधानांच्या दौऱयादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत झालेला गोंधळ लक्षात घेता हे प्रकरण श्री. पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
सध्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धूम आहे. 16 जानेवारी रोजी निवडणूकणू प्रचाराचा शेवटचा दिवस होता.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रचारानिमित्त जिल्ह्यात होते.ते लाखनी तालुक्यातील लोकांना भेटून प्रचार करीत असताना पटोले यांनी केलेले कथित वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. फुशारक्या मारण्याच्या नादात श्री. पटोले यांनी निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्याची चर्चा आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून , त्यावर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाच्या
वतीने कारवाईची मागणी होत आहे.
पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो-नाना पटोले

कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा भाजयुमो गोंदिया तर्फे निषेध
blank
तिरोडा- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेमध्ये मी मोदिला केव्हाही मारु शकतो असे वक्तव्य करणाऱ्या व स्वस्त लोकप्रियता प्राप्त करणाऱ्या नाना पटोले यांचा भाजपा जिलाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या सूचनेवरुन आमदार विजय राहंगडाले यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात जाहिर निषेध व पोलीस स्टेशन येथे तक्रार नोदविन्यात आली. सदर घटनेत कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.या प्रसंगी शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, तालुका अध्यक्ष बाला वाहिले,जिल्हा सचिव, राजेश मलघाटे,शितल टिवड़े,अमित पारधी,विक्की परमार,नंदू राहंगडाले, उमेश वाल्मीक,अमित आगाशे, नागेश तरारे,गुड्डू चौधरी, सुरेंद्र चौधरी, राहुल कुशराम आदि कार्यकर्ता उपस्थित होते.
पटोलेंनी तोंड सांभाळून बोलावे – खा. सुनील मेंढे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखले जातात. ऐरवी पटोलेंना गांभीर्याने घेणे गरजेचे नाही. मात्र देशाच्या पंतप्रधानाच्या संदर्भात वादग्रस्त आणि अपमानजनक वक्तव्य करून पटोलेंनी आपली लायकी दाखवून दिली आहे. पटोलेंच्या या वक्तव्याचा निषेध करीत असून त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी पोलिसांत तक्रारी दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू. पंतप्रधानांच्या बाबतीत असे बोलणाऱ्या पटोले यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रीया खासदार सुनील मेेंढे यांनी दिली.

blank