
वाशिम, दि. 20 -: युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या वतीने 21 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत चित्रपट उद्योगातील करिअर या विषयावर मुंबई विद्यापिठाचे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स सहयोगी प्राध्यापक आणि माजी संचालक डॉ. मंगेश बनसोड, पदमश्री प्राप्त सुप्रसिध्द अभिनेते मनोज जोशी आणि चित्रपट निर्माता व अभिनेते संदीप घुगे हे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. तरी इच्छुक युवक/युवतींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा.
या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी फेसबुक https://www.facebook.com/MaharashtraSDEED तसेच https://www.youtube.com/channel/UC702gQB5q7ValTABN4FHw1A या लिंकचा वापर करावा. काही अडचणी असल्यास 07252-231494 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.