38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता विहिरीत पडून बिबट व रानडुकरांचा मृत्यू

विहिरीत पडून बिबट व रानडुकरांचा मृत्यू

0
149

blank

गोंदिया,दि.22ःः जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या किडंगीपार हरीचंद दादूजी तुरकर(दि.21) यांच्या शेतातील विहिरीत सायकांळी 7 ते 7.30 वाजेच्या दरम्यान बिबट व तीन रानडुक्कर विहीरीत पडल्याची घटना  21 जानेवारीला उघडकीस आली.तिरोडा वनपरिक्षेत्राधिकारी एस.के.आकरे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पाहणी केली असता विहीरीत बिबटसह रानडुकर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने व रात्र झाल्याने वनकर्मचारी यांना पाचारण करण्यात आले.आज सकाळी 22 जानेवारीला उपवनसरंक्षक कुलराजसिंग यांना माहिती देत घटनास्थळाचा पंचनामा करुन विहिरीतून मृत बिबट व रानडुकरांना बाहेर काढले.यावेळी मानद वन्यजिव रक्षक मुकुंद धुर्वे,सावन बहेकार,बीटरक्षक एम.जे.सुर्यवंशी उपस्थित झाले.पशुधन विकास अधिकारी डाॅ.विवेक गजरे,डाॅ.रेणुका शेंडे यांनी वन्यप्राण्याचे शवविच्छेदन करण्यात आले.बिबट नर असल्याचे तपासणी दरम्यान समोर आले.मृत बिबटयाला उपस्थितांसमोर जाळण्यात आले तर रानडुकरांना खोल खड्यात पुरण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.के.आकरे यानी दिली.

blank