35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 20 येथे तिन हाॅयमाॅस्टचे भूमीपुजन

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 20 येथे तिन हाॅयमाॅस्टचे भूमीपुजन

0
57

blank

महिला व बालकल्याण सभापती मालतीताई राजेश कापसे यांच्या प्रयत्नाला यश
गोंदिया,21जानेवारी- गोंदिया नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती मालतीताई राजेश कापसे यांच्या विशेष प्रयत्नातून, शास्त्रीवार्ड (प्रभाग क्रमांक 20) येथील गोल्ड सिनेमा चौक,संत जगनाडे चौक व पराते काॅम्पंलेक्स या चौकात प्रत्येकी एक असे एकूण तिन हाॅयमाॅस्ट मंजूर करण्यात आलेले होते.
या हाॅयमाॅस्टचे भूमीपुजन 21 जानेवारी,शुक्रवारी सौ.मालतीताई कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी समाजसेवी प्रेम जयस्वाल,रंगलाल वंजारी, माजी गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये,प्रभाकर लांडे,समाजसेवी राजेश कापसे,स.शिक्षक त्रिलोक चौधरी,सौ.वर्षा बैस,सौ.कुर्वेताई,श्रीमती वैशाली मेश्राम, बंटी ढबाले, जितेंद्र पारधी,बाला निंबाळकर, पप्पु मुनेश्वर,सोनु निंबाळकर, लोकेश पटले,छोटु रामटेककर ,सोनु सोनवाने,पप्पु कनोजे इ.मान्यवर
उपस्थित होते.संचालन व आभार राजेश कापसे यांनी मानले.

blank