
गोंदिया,दि.24ः- जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील हिराटोला येथील रहिवासी असलेला मुकुल बोपचे या 19 वर्षीय भारतीय नौसेनेत रुजू झालेल्या युवकाची प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणार्या परेडमध्ये निवड झाल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.गोंदिया -भंडारा जिल्ह्या मधून निवड झालेला तो एकमेव आहे.
भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. त्यातच भारतीय नौसेनेत रुजू व्हायची प्रचंड ईच्छा बाळगून आपलं ध्येय गाठण्यासाठी मुकुलने अहोरात्र कठोर परिश्रम करून ऑगस्टमध्ये लक्ष पूर्ण करीत गोंदिया जिल्ह्याची मान उंचावली आहे.
मुकुल देवेंद्र बोपचे असे नाव असून त्याची ऑगस्ट 2021 मध्ये नेवीमध्ये नियुक्ती झाली.विशेष म्हणजे मुकुल हा एका छोट्याश्या खेडेगावात वाढला आणि त्याचे शिक्षण ही गावाकडेच झाले आहे. सेवेत रुजू झाल्यानंतर 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुकुल आता दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी राजपथावर परेड मध्ये झळकणार आहेत. मुकुल हा राजधानी दिल्ली येथे पार पडणाऱ्या राजपथावरील परेडमध्ये चालणारा गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पहिला ठरणार आहे





