35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ पाणी गुणवत्ता प्रशिक्षण थाटात

पाणी गुणवत्ता प्रशिक्षण थाटात

0
42

blank

पवनी /धाबे ता.31 :-येथील जननायक बिरसा मुंडा उलगुलान सभागृहात जल जीवन मिशन आणि पाणी गुणवत्ता प्रशिक्षणाचे आज (ता.31) आयोजन करण्यात आले.
मंचावर सरपंच पपीताताई नंदेश्वर,पसरपंच परागजी कापगते, येरंडी/दर्रे च्या उपसरपंच सोनियाताई वाढई,पं. स. अर्जुनी/मोर चे पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी श्री अंबुले आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वंदनीय गाडगेबाबांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री अंबुले साहेब यांनी केंद्र सरकारची योजना जलजीवन मिशन यावर मार्गदर्शन करून ‘हर घर नल से जल’याचे महत्व पटवून देऊन पाणी गुणवत्ता कशी टिकवून ठेवता येईल यावर विस्तृत मार्गदर्शन केलं. प्रशिक्षक ईश्वरदास भंडारी आणि मुकेश डोंगरवार यांनीही महिलांना प्रशिक्षण दिले.
झाशीनगर पंचायत समिती गणातील विविध ग्रामपंचायतिच्या महिला भगिनीनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. संचालन श्री भंडारी यांनी केले.

blank