30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने नवनियुक्त शिक्षणाधिकारी मोटघऱेंचा सत्कार

शिक्षक भारती संघटनेच्यावतीने नवनियुक्त शिक्षणाधिकारी मोटघऱेंचा सत्कार

0
55

blank

गोंदिया,दि.01ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त प्राथमिक विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांची शिक्षक भारती शिक्षक संघटनेच्या वतीने कार्यालयात भेट घेत आणि शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली.तसेच प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करुन त्यांना कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे नागपूर विभागाचे उपाध्यक्ष बन्सीधर शहारे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष महेंद्र सोनवणे, प्राचार्य मनोज राहांगडाले, प्राचार्य प्रतिभा आम्ले,प्रा.हरिश्चंद्र दराडे,प्रा.रामदास बांद्रे आणि इतर शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.

blank