35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home शैक्षणिक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश

0
52

गडचिरोली,दि.05: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2022-23 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय भामरागड जि.गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व इयत्ता 1 ली साठी जन्म दिनांक 01 ऑक्टोबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्यांचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लक्ष पेक्षा कमी असावे.या योजनेअंतर्गत विधवा/घटस्फोटित/निराधार व बि.पी.एल. यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

इयत्ता 1 ली व 2 री प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय भामरागड जि.गडचिरोली तसेच नजीकच्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 15 मार्च 2022 पर्यंत सादर करण्यात यावे असे सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि.गडचिरोली यांनी कळविले आहे.