
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील बोरटोला ते मळेघाट पांदन रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते (ता.५) करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य संदिप कापगते, पंचायत समिती सदस्या कुंदा लोगडे, बोरटोलाच्या सरपंच कुंदा वैद्य, उपसरपंच काशिनाथ कापसे, ग्रा.पं. सदस्य दिपंकर उके, मोरेश्वर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.सदर पांदन रस्ता काम ग्रामपंचायत बोरटोला/ईंझोरीच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले. त्यासाठी २५ लाखांचा निधी खर्च होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाचे संचालन दिपंकर उके यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.





