
सावरटोला येथे शिवसेना शाखा स्थापन
अर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्थ वाढविण्यासाठी गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणार. गावागावात स्थापन झालेल्या शाखेतील नवनिर्वाचित शिवसैनिकांनी जनसेवेचा वसा हातात घेवुन जनतेच्या कामासाठी धावून जावे. असे आवाहन शिवसेनेचे गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केले आहे.
सावरटोला येथे आयोजित शिवसेना शाखा उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना शाखा फलकाचे अनावरणही करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, विभाग प्रमुख स्वप्नील पोवडे, उपविभाग प्रमुख सुनील सांगोडकर, नवेगावबांध शाखा प्रमुख मुकेश चापेकर, माधवराव डोंगरावर जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी काही नवीन कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यात योगन गजभिये, केसर गजभिये, यशोदा मेश्राम, रीता मेश्राम, लालन शेन्डे, प्रकाश टिकले, मधुकर साखरे, जयदेव शेन्डे यांचा समावेश आहे.
संचालन रमेश उत्तमवार यांनी केले. आभार पुष्पा लांजेवार यांनी मानले. या वेळी सावरटोला शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून पुष्पा लांजेवार, उपप्रमुख केसर गजभिये, सचिव शुभांगी उत्तमवार यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान डिशंकर उत्तमवार, अनिरुद्ध लांजेवार, अमितकुमार लांजेवार, संजय मेश्राम, रामेश्वर बावणे, लक्ष्मी उत्तमवार, शुभम शिल्लेवार आदि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.





