
अमरावती,-गुन्हे शाखा अमरावतीचे पथक सोमवारी सांयकाळी गस्तीवर असताना त्यांनी नांदगाव पेठ हद्दीत छापा टाकून राजस्थानवरून आलेला 27 लाखाचा सुगंधित तंबाखू,गुटखा व 20 लाखा ट्रक जप्त केला. या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आह.शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारावर नागपुर रोडवरील बिझीलॅन्ड समोर पोलिसांनी सापळा लावला. यावेळी आरजे 07 जीबी 9839 क्रमांकाच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पंचासमक्ष व अन्न औषधी अधिकारी यांच्यासह तपासणी झाली. त्यात सुगंधित प्रतिबंधित तंबाखु गोल्ड – 2, सुगंधित प्रतिबंधित तंबाखु मन – 3, सुगंधित प्रतिबंधित तंबाखु सुपर गोल्ड प्रिमियम- 4, सुगंधित प्रतिबंधित तंबाखु बब्बु गोल्ड – 5, सुगंधित प्रतिबंधित तंबाखु गोल्डन युग – 6, सुगंधित प्रतिबंधित तंबाखु
क्लासिक गोल्डन युग -7 व विना नावाचा गुटखा असा एकुण 27 लाख 5 हजार 320 रुपयांचा माल व वाहतुक करण्यासाठी वापरलेता ट्रक किंमत 20 लाख असा एकुण 47 लाख 5 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी शिवकिरण बिशनोई (वय 38 वर्ष,रा. नोखा बिकानेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सदरची कारवाई पोलिस आयुक्युत डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, कर्मचारी राजु आप्पा, फिरोज खान,
सतीश देशमुख , निवृती काकड , उमेश पडे यांनी केली.





