
इटानगर- अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या तडाख्यात भारतीय सैन्याचे सात जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती सैन्याने दिली.
भारतीय सैन्याचे जवान रविवारी, सहा फेब्रुवारी रोजी गस्तीवर असताना हिमस्खलनात बेपत्ता झालेत. त्यांच्या मदतीसाठी तज्ज्ञांचे पथक विमानाने पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपासून या भागात हवामान खराब आहे. तसेच जोरदार बर्फवृष्टी होत आहे.हिवाळ्याच्या महिन्यांत उंचावरील भागात गस्त घालणे कठीण होते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये लष्कराने आपले जवान गमावले आहेत. मे २0२0 मध्ये सिक्कीममध्ये हिमस्खलन झाले होते. यावेळी दोन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच ऑक्टोबर २0२१ मध्ये झालेल्या हिमस्खलनात नौदलाचे ५ जवान मरण पावले होते. भारतीय लष्कराने सोमवारी एक निवेदन जारी करून या जवानांचा शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे म्हटले आहे. बचाव कार्यात विशेष पथकांना विमानाने पाठवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
कामेंग भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. यावेळीच हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील किमान ७ जवान अडकले असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.





