37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ पुलावरील कठड्यासाठी चक्काजाम

पुलावरील कठड्यासाठी चक्काजाम

0
63

blank

आरमोरी- वैनगंगा नदी पुलावर कठडे लावण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकहीत संघर्ष समितीच्या वतीने ब्रम्हपुरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीलगत ८ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प पडली होती. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
नागपुर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाचे कठडे पुराने २0२0 मध्ये वाहून गेले. त्यामुळे सदर पुलावर नव्याने कठडे लावण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. वैनगंगा नदी पुलावरून चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात आवागमण सुरु असते. मात्र, या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे नसल्यामुळे एका युवकाचा जीव सुद्धा गेला. तरी मात्र, प्रशासन सुस्त व कुंभकर्णीय झोपेत आहे. प्रशासनाला, राष्ट्रीय महामार्ग विभागाला झोपेतून जागे करण्यासाठी आरमोरी येथील लोकहित संघर्ष समितीने २ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात केली. परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाला नाही.
राष्ट्रीय महामार्ग विभागाची उदासीनता बघुन पुन्हा ४ फेब्रुवारी रोजी वैनगंगा नदीत ‘जल आंदोलन’ करण्यात आले होते. तसेच ७ दिवस अहोरात्र धरणे आंदोलन करूनही तालुक्यातील नव्हेच तर जिल्ह्यातील कोणत्याही अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार नागपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ लोकहित संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात नारेबाजी करून रस्त्याच्या मधोमध टायर जाळून निषेध केला. यानंतर शेकडो आंदोलकांनी पूर्ण रस्ता जाम करून तब्बल दीड तास वाहतूक विस्कळीत केली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांची रांग लागली होती.
या आंदोलनात माकपचे अमोल मारकवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे निखिल धार्मिक, युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रंजित बनकर, शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे, जिल्हा संघटक राजू अंबानी, वृक्षवल्ली वन्य जीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाणे, भाकपचे शहर सचिव संजय वाकडे, प्रफुल खापरे, नगरसेविका सिंधू कापकर, शुभांगी गराडे, मीनल बनसोड, मिनाक्षी सेलोकर, छाया मानकर, देविदास काळबांधे, शाबीर शेख, राकेश सोनकुसरे, अंकुश गाढवे, रिंकू झरकर, अक्षय भोयर, विनोद निमजे, सारंग जांभुळे, प्रथमेश साळवे, विनोद निमजे, अक्षय बोरकर, निखिल बनसोड, उमेश पिंपळकर, अरविंद धकाते, अनंता भोयर, मनोज गेडाम, श्रीराम ठाकरे, प्रशांत सोरते, अजय कुथे, अजय खेडकर, अभिषेक जुआरे, विद्या मेर्शाम, सुरज पडोळे, दिवाकर गराडे, केवळ दुमाणे, अनंत भोयर, अंकुश दुमाणे, विकास धादरे, हर्ष भोयर, दीपक सोनकुसरे, नेपचंद्र पेलणे, विशाल चौके, तुषार शिलार , मयूर दिवटे, वसीम शेख, निखिल दिवटे, सचिन लांजेवार, कुणाल भरणे, किशोर जावंजलकार यांच्यासह मनसे, युवारंग, प्रहार, माकप, भाकप, शिवसेना, वृक्षवल्ली वन्य जीव संरक्षण संस्था आदी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

blank