43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदियाच्या एव्हरग्रीन हाँटेलात युवक युवतीचा मृत्यू

गोंदियाच्या एव्हरग्रीन हाँटेलात युवक युवतीचा मृत्यू

0
536

blank

गोंदिया,दि.11ः-फुलचूर गोंदिया येथील हाॅटेल एव्हरग्रीनमध्ये विष पिलेल्या प्रेमीयुगुलाचा केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आकाश महेश शेठिया (वय २२, रा. गोविंदपूर, गोंदिया) व रोहिणी देवराव पवार (वय २१, रा. श्रीरामनगर, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

काही वर्षांपासून आकाश आणि रोहिणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. अशातच गोविंदपूर येथील मावशीच्या घरी लग्न असल्यामुळे रोहिणी ही गुरुवारी (ता. १०) नागपूर येथून मावशीकडे आली होती. दुपारच्या सुमारास रोहिणी घरून निघून गेली होती. तिची आकाशसोबत भेट झाली. दोघांनीही रात्री फुलचूर येथील हाॅटेल एव्हरग्रीन गाठले. विष घेण्यापूर्वी आकाशने आपल्या आईला हाॅटेल एव्हरग्रीन येथे असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. त्यामुळे त्याच्या आईने हाॅटेल गाठत वेटरच्या मदतीने रूममध्ये जाऊन बघितले असता, आकाश आणि रोहिणी हे दोघेही बेशुद्धावस्थेत दिसले. विष घेतल्याचे लक्षात येताच दोघांनाही केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल मलेवार करीत आहेत.

blank