29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राष्ट्रीय देश ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन

0
28

blank

मुंबई- बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी मुंबईत निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षाच्या होत्या.

साधना यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. निधनाचे वृत्त कळताच अभिनेत्री हेलन आणि वहिदा रेहमान  त्यांच्या सांताक्रुझमधील साधना बंगल्यावर पोहोचल्या आहेत.

साधना यांचा जन्म दोन सप्टेंबर १९४१मध्ये कराची येथे झाला. १९४७नंतर त्या मुंबई आल्या. १९५८ मध्ये त्यांनी ‘अबाना’ हा पहिला चित्रपट केला. यात त्यांनी शीला रामानी यांच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांनी जवळपास ३५ चित्रपटामध्ये काम केले आहे.

वह कौन थी, मेरा साया, वक्त चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. इंतकाम, एक फूल दो माली आणि गीता मेरे नाम या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शितही केले होते. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले.