36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News ‘गोली मार भेजे में’ गाणे बेतले युवकाच्या जिवावर

‘गोली मार भेजे में’ गाणे बेतले युवकाच्या जिवावर

0
38

जबलपूर- ‘सत्या‘ या चित्रपटातील ‘गोली मार भेजे में…‘ हे गाणे एका युवकाच्या जिवावर बेतले आहे. हातात पिस्तूल घेऊन गाणे गुणगुणत असतानाच चुकून गोळी सुटल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

वीरेंद्र शर्मा (वय 26) या युवकाने बुधवारी ‘सत्या‘ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून झाल्यानंतर हातात पिस्तूल घेऊन गाणे गुणगुणत होता. गाणे म्हणत असतानाच चुकून गोळी सुटून डोक्‍यात घुसली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

blank