
गडचिरोली,दि.13ः- जिल्ह्यातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्रात आधीपासून असलेला वाघ अन्य कोणत्याही दुसऱ्या नर वाघाला आपल्या परिक्षेत्रात येऊ देत नाही. त्यामुळे दोन नर वाघ आमोरा समोर येऊन त्यांच्यात लढाई होण्याचे प्रसंग अनेक वेळा होतात. ही लढाई इतकी भीषण असते की दोन्ही वाघ गंभीर जखमी होतात. त्यात कमजोर असलेला वाघ हा पराभव पत्करून निघून जातो किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू ओढवतो.तसाच प्रकार याठिकाणी घडला असावा व या वाघाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आलापल्ली वन विभागात असलेल्या आल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील नेंडर कक्ष. क्र. १२ मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे.आलापली वनविभागात वाघाचे अस्तित्व असून घनदाट जंगलाने हि व्यापलेले आहे .सदर जंगलात वाघ आपले कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करून ठेवतात.यात नवीन वाघ जंगलात शिरकाव केला गेला असेल आणि यातच दोन नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत दीड वर्षाचा नर जातीच्या एका वाघाचा मृत्यू शनिवारी रात्री झाला असावा असा अंदाज वनाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. जंगलातील नेंडर कक्ष. क्र. १२ मध्ये लावलेल्या ट्रॅप कॅमेरात
कैद झाले आहे का हे वनाधिकारी शोध घेत आहेत तर मागील महिन्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील मौसम येथे एका पट्टेदार वाघिणीची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वनविभाग या प्रकरणाकडेही गांभीर्याने पहाणार आहे .





