
सहभाग घेण्याचे आवाहन
गोंदिया,दि.18 : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. स्पर्धासाठी 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
“स्वीप” कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करुन आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करत आहे. “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य” या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धाचा समावेश आहे.
प्रश्नमंजूषा स्पर्धेव्दारे निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धेच्या प्रत्येक श्रेणीसाठी पहिले, दुसरे व तिसरे बक्षिस तसेच विशेष उल्लेखनीय बक्षिस देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकतस्थळ https://ecisveep.nic.in/contes
सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह [email protected] या ई-मेलवर पाठवण्यात याव्या, असेही आयोगाच्यावतीने कळविण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय मतदार जनजागृती सर्धा (National Voters – Awareness Contest) यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व याबाबतच्या अधिक माहितीसाठी गोंदिया जिल्हयाच्या संकेतस्थळाला (https://gondia.gov.in/) येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.





