37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ भेल प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार:-केंद्रीय मंत्री फग्गन सिह कुलस्ते

भेल प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार:-केंद्रीय मंत्री फग्गन सिह कुलस्ते

0
67

blank

आमगाव,दि.19ः  गोंदिया भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील रखडलेला भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड चा इलेक्ट्रिक उपकरण बनवणारे मोठे प्रकल्प केंद्र सरकारने मंजुरी प्रदान केल्यानंतर ही हा प्रकल्प प्रारंभ झाला नाही. यात केंद्र सरकार काय भूमिका घेईल यावर फग्गन सिंह कुलस्ते केंद्रीय राज्यमंत्री ग्रामविकास व इस्पात यांनी भेल प्रकल्प हा महाराष्ट्रातील तर विदर्भातील मोठा प्रकल्प आहे,यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना नक्की रोजगार उपलब्ध होईल याची माहिती आहे, यात हा प्रकल्पात काय उणिवा आहेत यासाठी भारी उद्योग मंत्री आणि विभागाशी चर्चा करून हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करणार तर गोंदिया भंडारा जिल्हा हा आदिवासी भाग आहे , हे प्रकल्प सुरू झाले तर नक्की रोजगार संधी उपलब्ध होईल.
तसेच जिल्ह्यातील गौण खनिज उपलब्ध आहे यात गौण खनिज उपयोगी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकार पुढाकार घेईल काय ? यावर त्यांनी बालाघाट, भंडारा,गोंदिया जिल्हा यात गौण खनिज वर उपलब्धतेवर व्यवसाय सुरू व्हावे यासाठी नियोजन आहे.यात राज्य सरकारच्या माध्यमाने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.
तसेच कचारगड हे आशियातील मोठे आदिवासी बांधव यांचे श्रद्धास्थान आहे.यातील विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमाने टूरीजम्स व पर्यटन यावर विकास यावर भर देण्यात येईल असे सांगितले. यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी तसेच त्या माध्यमातून विकास निधीतून या टूरीजम्स व पर्यटन विकासाला निधी उपलब्ध करून देणाचे आश्वासन दिले.सदर भेल प्रकल्प २०१६ सुरवात करण्यात आले,हे प्रकल्प ४८० एकर भूमीत उभारण्यात येत होते तर २७३१ कोटींची निधीतुन या प्रकल्प खर्च मंजूर करण्यात आले होते, या प्रकल्पात तीन हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार होते,तसेच२०१६ ला विविध तांत्रिक पोष्ट भरण्यासाठी जाहिराती देण्यात आले होते.परंतु हा प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद पडले.

blank