32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले मावळे बना :- लायकराम भेंडारकर

शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले मावळे बना :- लायकराम भेंडारकर

0
39

blank

अर्जुनी मोर. :– छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. राजे शेतकरी यांचे हित साधणारे होते.शिवाजी महाराजांनी कधीच भेदभाव केला नाही. लोकशाहीचा पाया त्यावेळी क्षत्रपती शिवरायांनी तयार केला.त्यामुळे राजांच्या काळात सर्व बहुजन वर्गातील मावळे सुखी संपन्न व लढवय्ये होते.सर्व सामान्यजनतेसाठी शिवराय आदर्श होते.शिवाजी महाराज युगपुरूष होते.त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपन महाराजांचे शूरवीर मावळे बनन्याचा प्रयत्न केला पाहीजे असे मौलीक विचार बोंडगाव देवी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी मांडले.
अर्जुनी मोर तालुक्यातील खांबी येथे आयोजित ता.१९ क्षत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष अतिथी म्हणुन ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव तुळशीकर होते.अतिथी म्हणुन नवेगांवबांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे, पं.स.सदस्य संदिप कापगते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल,सरपंच प्रकाश शिवनकर, उपसरपंच देवानंद रामटेके, पोलीस पाटील नेमिचंद मेश्राम, पुरुषोत्तम डोये, विजय खोटेले, भगवान मेंढे, प्रा.घनश्याम भेंडारकर, राधेश्याम भेंडारकर, सर्व ग्रा.प.सदस्य, गावातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे हस्ते करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनीही शिवाजी महाराज यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकुन विस्तृत माहिती दिली. संचालन व आभार खोटेले यांनी केले. जयंती समारोहाला ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धाबेटेकडी/आदर्श येथे शिवजयंती साजरी
अर्जुनी मोर. तालुक्यातील धाबेटेकडी/आदर्श येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुर्णाकृती पुतळ्याला पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने यांचे हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून नमन करण्यात आले. यावेळी सरपंच दिपक सोनवाने, सर्व ग्रा. पं.पदाधिकारी, व गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.

blank