
चिचगड,दि.25ः- चिचगड पोलीस ठाणेंतर्गत 24 फेबुवारीला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मंगेश रामलाल मडकाम या तीस वर्षीय युवकांनी आपल्या राहत्या घरीच छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.मृताची प्रकृती बरेच दिवसापासून व्यवस्थित नसल्यामुळे आणि त्यांची पत्नी पण आठ दिवसापूर्वी माहेरी गेल्याने व घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ही टोकाची भूमिका घेतली असावी अशी चर्चा आहे.घटनेची नोंद पोलीस स्टेशनला झाली असून पीएसआय मनोहर इस्कापे हे तपास करीत आहेत.





