37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पवनी /धाबे येथे शौचालयाचे भूमिपूजन,गावांची वाटचाल स्वच्छतेकडे

पवनी /धाबे येथे शौचालयाचे भूमिपूजन,गावांची वाटचाल स्वच्छतेकडे

0
33

blank

अर्जुनी /मोर ता.25:-तालुक्यातील ग्रामपंचायत पवनी /धाबे येथे स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील शौचालाय बांधकाम करण्यास येथील लाभार्थ्यांनी सुरुवात केली आहे. दरम्यान लाभार्थी बाबुराव शुक्कल काटेंगे यांच्या येथे सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर यांच्या हस्ते सौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तलाठी कु ए. बी. बिसेन,अर्जुनी /मोर पंचायत समितीचे पाणी व स्वच्छता विभागाचे गट समन्वयक एच.आर.अंबुले,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )अंतर्गत गावांची वाटचाल स्वच्छतेकडे होऊ लागली आहे.प्रत्येक गांव आणि गावातील प्रत्येक घरी शौचालय देण्याचे शासनाचे धोरण आहे.सण 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणातर्गत पात्र लाभार्थ्यांना सौचालयाचा लाभ देऊन संपूर्ण जिल्हा हागनदारी मुक्त करने आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी शौचालय बांधकाम करण्याचे निर्देश दिले असून येत्या 5 मार्च पर्यंत पूर्ण करावयाचे आहेत.

blank